महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आघाडीच्या ऑटो कंपन्यांच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये घसरण - toyota sales in July

वाहन कंपन्यांनी जुलैमधील वाहन विक्रीची आकडेेवारी आज जाहीर केली आहे. यामध्ये एमजी मोटर्स इंडिया कंपनी वगळता सर्वच कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण झाली आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Aug 1, 2020, 7:45 PM IST

नवी दिल्ली– कोरोनाचे संकटाने बसलेल्या फटक्यांमधून बहुताश वाहन कंपन्या सावरल्या नाहीत. मारुती सुझुकी, ह्युदांई, महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये घसरण झाली आहे.

वाहन कंपन्यांनी जुलैमधील वाहन विक्रीची आकडेेवारी आज जाहीर केली आहे. यामध्ये एमजी मोटर्स इंडिया कंपनी वगळता सर्वच कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण झाली आहे.

  • गतवर्षीच्या जुलैच्या तुलनेत मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 1.1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
  • ह्युदांई मोटर इंडियाच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. जुलैमध्ये ह्युदांईच्या 41 हजार 300 वाहनांची विक्री झाली आहे.
  • महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 36 टक्के घसरण झाली आहे. महिंद्राच्या वाहनांची जुलैमध्ये 25 हजार 678 वाहनांची विक्री झाली आहे.
  • टोयोटा किर्लोस्करच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 48 टक्के घसरण झाली आहे. जुलै 2020 मध्ये देशात 5,386 वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी देशात 10,423 वाहनांची विक्री झाली होती.

एमजी मोटर्सच्या वाहन विक्रीत 40 टक्क्यांची वाढ

एमजी मोटर इंडियाच्या वाहन विक्रीत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने वर्षभरातच 1 लाख वाहन विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details