नवी दिल्ली- आर्थिक व्यवहारासाठी ( ATM transactions ) बँकेचे एटीएम वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून ( 1 जानेवनारी ) बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 20 रुपयांऐवजी 21 रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत.
आरबीआयने 10 जून 2021 रोजी परिपत्रक ( RBI notification on ATM Charges ) काढून बँकांना ग्राहकांकडून करासहित 21 रुपये घेण्याची परवानगी दिली होती. असे असले तरी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खाते असलेल्या बँकेच्या एटीममधून 5 वेळा पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार नाही. तर महानगरामधील इतर बँकांच्या एटीममधून विनाशुल्क पैसे काढण्यासाठी तीनची मर्यादा आहे. त्याहून अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास शुल्क लागू होते. तर महानगराव्यतिरिक्त बँकाँच्या एटीएमधून पैसे काढण्याटची पाचची मर्यादाही ( eligible for five free transactions ) आहे. त्याहून अधिक वेळा पैसे काढल्यास शुल्क लागू होणार आहे.
हेही वाचा-Life Insurance Policy : जीवन विमा पॉलिसीसाठी दावा कसा करणार