महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

...तर ३१ मार्चपर्यंत बंद होतील देशातील निम्मे ATM - bank

आजकलचे युग हे डिजिटल आहे. तो काळ गेला जेव्हा लोक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लावत होते. आता एटीएममुळे लोकांना त्वरित पैसे काढता येतात. मात्र विचार करा जर देशातील ५० टक्के एटीएम अचानक बंद पडलेत तर. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार हा विचार वास्तविकतेत उतरू शकण्याची चिन्हे आहेत.

सांकेतिक छायाचित्र

By

Published : Mar 28, 2019, 7:04 PM IST

टेक डेस्क - आजकलचे युग हे डिजिटल आहे. तो काळ गेला जेव्हा लोक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लावत होते. आता एटीएममुळे लोकांना त्वरित पैसे काढता येतात. मात्र विचार करा जर देशातील ५० टक्के एटीएम अचानक बंद पडलेत तर. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार हा विचार वास्तविकतेत उतरू शकण्याची चिन्हे आहेत.

कॉन्फिड्रेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (CATMi) यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार सध्या देशात जवळपास २,३८,००० एटीएम संचालित होत आहेत. यापैकी १,१३,००० एटीएम या महिन्याच्या शेवटी बंद होऊ शकतात. CATMi च्या रिपोर्टनुसार एटीएमच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला अपग्रेड करण्यासाठी नवीन नियम आले आहेत. त्यामुळे एटीएमचे संचालन एजेन्सीजसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

उल्लेखनीय म्हणजे नोटाबंदीनंतर जवळपास सर्व एटीएम अपडेट करावे लागले होते. कारण २ हजार रुपयांच्या नोटेपासून ते १०० रुपयाची नोट यांचे आकार वेगवेगळे होते. त्यामुळे एटीएमला नोटांच्या आकारानुसार बदलण्यात येत आहे. ATM मध्ये नोटा ठेवण्यात येणाऱ्या कप्प्यांना बदलण्यात येत आहे. यासाठी जवळपास ३,००० कोटी रुपयांच्या खर्च येत आहे. हा खर्च बँका द्यायला तयार नाहीत. यासाठी वेगळा फंडही उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे एटीएम बंद करणे केवळ हा विकल्प सध्या उपलब्ध आहे.

जर बँका एटीएम संचालनाची जबाबदारी घेतात तर मात्र या समस्येवर तोडगा निघू शकतो. एटीएमच्या देखभालीची आणि संचालनाची देखरेख अन्य एजन्सीज करतात. यासाठी एटीएम संचालकांना कंपनीकडून कोणताही अतिरिक्त खर्च मिळत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details