महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Apple TV+ लाँच, ऑनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिसची स्पर्धा शिगेला - amazon prime

Apple ने सोमवारी आयोजित इवेन्टमध्ये व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस 'अॅपल टीव्ही प्लस' लाँच केली आहे. अॅपलची ही व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस सब्स्क्रिप्शनवर उपलब्ध होणार आहे. यावर युजर्सला एक्सक्लूसिव्ह ओरिजनल कन्टेन्ट पाहायला मिळणार आहे.

सौजन्य - https://www.apple.com/in/apple-tv-plus

By

Published : Mar 27, 2019, 11:00 PM IST

टेक डेस्क - Apple ने सोमवारी आयोजित इवेन्टमध्ये व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस 'अॅपल टीव्ही प्लस' लाँच केली आहे. अॅपलची ही व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस सब्स्क्रिप्शनवर उपलब्ध होणार आहे. यावर युजर्सला एक्सक्लूसिव्ह ओरिजनल कन्टेन्ट पाहायला मिळणार आहे.

टीव्ही व्यतिरिक्त अॅपलने 'अॅपल न्यूज प्लस' ही सेवा पण सादर केली आहे. याचा वापर करण्यासाठीही युजर्सला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. कंपनीने व्हिडिओ गेमिंगच्या चाहत्यांसाठीही 'Apple Arcade' सादर केले आहे. यासाठीही युजर्सला सब्स्क्रिप्शन घेणे गरजेचे असणार आहे. अॅपल टीव्ही प्लसच्या लाँचिंगनंतर अॅपलला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्सकडून कडवे आव्हान मिळणार आहे. अॅपल टीव्हीचा सर्वात मोठा फायदा हा असणार की यामध्ये युजर्सला जाहिरात बघावी लागणार नाही. भारतासमवेत १०० देशांमध्ये अॅपल ही सेवा लाँच करणार आहे.

इवेन्टच्या लाँचिंग दरम्यान अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, की सर्जनशीलतेवर त्यांचा विश्वास आहे. चांगले साहित्य जग बदलण्यासाठी मदतगार ठरते. अॅपलने व्हिडिओ कन्टेन्टसाठी अनेक हॉलीवूड स्टार्स आणि प्रॉडक्शन कंपन्यांसोबत भागीदारी केल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार अॅपलने 'Apple' च्या नावाने क्रेडिट कार्ड पण लाँच केले आहे. या क्रेडिटसोबत फ्रॉड करणे एक मोठे आव्हान आहे. अॅपलने जबरदस्त सिक्युरिटीसह हे कार्ड लाँच केले आहे. अमेरिकी इन्वेस्टमेन्ट बँक गोल्डमॅन साक्ससह अॅपलने भागीदारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details