नवी दिल्ली– अमेझॉनने अलेक्सा अॅपचे नवे व्हर्जन लाँच केले आहे. यामधून ग्राहकांना विविध सेवा वेगवान पद्धतीने घेता येणार आहेत.
अलेक्साचे नवे अॅप हे आयओएस आणि अँड्राईडवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये ग्राहकांकडून वापरण्यात येणारे फीचर हे होम स्क्रीनवर दिसणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना अलेक्साचा वापर सोप्या पद्धतीने करता येणार आहे.
अलेक्साच्या नव्या अॅपमधील अपडेट पुढील महिन्यात होणार आहेत. हा बदल सर्व जुन्या अॅप वापरकर्त्यांना ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. तर नव्या ग्राहकांना अलेक्सा अॅप हे अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
- होम स्क्रीनवर वैयक्तिक सूचना दिसणार आहेत. यामध्ये रिमाईंडर आणि ऑडीबल पुस्तक आदींचा समावेश आहे.
- होम स्क्रीनमध्ये अलेक्साचे वर बटन दिसणार आहे. त्यामुळे ग्राहकाला लगेच बोलून अलेक्सा अॅप वापरता येणार आहे.
- हँड फ्री म्हणजे केवळ अलेक्सा बोलून अॅप सुरू करता येणार आहे. नव्या ग्राहकांना अलेक्सामध्ये संगीत आणि खरेदी अशा सूचना दिसणार आहेत. ग्राहकाने 'मोअर' हा पर्याय निवडल्यानंतर कौशल्य, रुटिन्स, सेटिंग्ज असे विविध फीचर दिसणार आहेत.