महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अॅमेझॉनचा १९ जानेवारीपासून सुरू होणार 'ग्रेट इंडियन सेल' - online Shopping

प्राईम सदस्यांना १२ तास आधी म्हणजे १८ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून 'ग्रेट इंडियन सेल' मध्ये खरेदी करता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड आणि स्टेट बँकेच्या मासिक हप्त्यावर ग्राहकांना १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Amazon
अॅमेझॉन

By

Published : Jan 10, 2020, 7:35 PM IST

बंगळुरू- अॅमेझॉन इंडियाने चालू वर्षातील 'ग्रेट इंडियन सेल' या सवलतीच्या खरेदी महोत्सवाची आज घोषणा केली. ग्राहकांना १९ जानेवारी ते २२ जानेवारीदरम्यान खरेदीवर सवलती मिळणार आहेत.

प्राईम सदस्यांना १२ तास आधी म्हणजे १८ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून 'ग्रेट इंडियन सेल' मध्ये खरेदी करता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड आणि स्टेट बँकेच्या मासिक हप्त्यावर ग्राहकांना १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-इन्फोसिसच्या नफ्यात २३.७ टक्क्यांची वाढ; मिळविले ४,४६६ कोटी रुपये

स्मार्टफोन, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्युटी, होम आणि किचन, टीव्हीएस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू इत्यांदीवर सवलती देण्यात येणार आहेत. अॅमेझॉनवर विविध वर्गवारीत २० कोटीहून अधिक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले.

हेही वाचा-चंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून मनीलाँड्रिगप्रकरणी कारवाई

ग्राहकांकडून खरेदीसाठी करण्यात येणाऱ्या ऑर्डरपैकी ९९.४ टक्के ऑर्डरमध्ये पिनकोड असतो. तर ६ लाख ५० हजार विक्रेत्यांना ५०० शहरांमधून केवळ ५ दिवसात खरेदीच्या ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने सांगितले. मागील सेलमध्ये सुमारे १५ हजारांहून अधिक विक्रेत्यांची विक्री दुप्पट झाली होती. तर लखपती असलेल्या विक्रेत्यांची संख्या (करोडपती विक्रेत्यांच्या संख्या धरून) २१ हजारांहून अधिक झाल्याचे कंपनीने म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details