महाराष्ट्र

maharashtra

कांदे भाववाढीनंतर महागणार फोडणीचाही 'तडका'

By

Published : Dec 21, 2019, 12:28 PM IST

गेल्या दोन महिन्यात पामतेल प्रति लिटर २० रुपयांनी महागले आहे. पामतेलाचे अचानक ३५ टक्क्यांहून अधिक दर वाढल्याने इतर खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत.

Edible rate
खाद्यतेल

नवी दिल्ली - कांदे आणि लसूणचे भाववाढीनंतर गृहिणींचे बजेट आणखी कोसळणार आहे. कारण देशातील खाद्यतेलाचेही भाव वाढणार आहेत. उद्योगातील तज्ज्ञांच्या मतानुसार खाद्यतेलाचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

गेल्या दोन महिन्यात पामतेल प्रति लिटर २० रुपयांनी महागले आहे. पामतेलाचे अचानक ३५ टक्क्यांहून अधिक दर वाढल्याने इतर खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामधून महागड्या खाद्यतेलाची आयात होत असल्याने खाद्यतेलाचे दर वाढल्याचे सोलव्हंट एक्स्टॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले.

हेही वाचा-...म्हणून फोक्सवॅगनला ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाकडून ६१२ कोटी रुपयांचा दंड


चालू वर्षात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. देशात रब्बी हंगामात अपेक्षेहून कमी प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील सोयाबीनचे उत्पादन हे १८ टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. भारत हा खाद्यतेलाचे आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. देशातील खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी देशाला बहुतांश आयातीवर अवलंबून राहावे लागते.

हेही वाचा- 'भारतीय उत्पादनांच्या निर्यातीत अडथळे आणणाऱ्या देशांना प्रत्युत्तर देवू'

कांदे दरवाढीचा ग्राहकांना बसला आहे फटका-

देशांमधील बहुतांश शहरात प्रति किलो १०० रुपये दराने कांदा विकण्यात येत आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा कांदे उत्पादनात सुमारे २५ टक्के घसरण झाल्याचा अंदाज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details