जळगाव - अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उसळी आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बड्या गुंतवणूकदारांनी सोने व चांदीची विक्री सुरू केली आहे. त्यातून मिळणारे भांडवल विविध नामांकित कंपन्यांच्या शेअर खरेदीसाठी वापरणे सुरू केले आहे. याच प्रमुख कारणामुळे सोने व चांदीचे दर सातत्याने कमी होत आहेत. हीच संधी साधून स्थानिक पातळीवरील लहान-मोठे गुंतवणूकदार सोने व चांदी खरेदीला पसंती देत आहेत.
हंगाम नसतानाही सराफ बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सुवर्णनगरी असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देखील सध्या सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
लग्नसराई नसतानाही दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केले राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण, 'हे' होणार फायदे
...म्हणून सराफ बाजाराताली परिस्थितीत वेगाने बदल
दीड वर्षांपूर्वी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. स्थानिक पातळीवर सराफ बाजारही बंद होते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडे वळवत, त्याठिकाणी ऑनलाईन स्वरूपात सोने व चांदी खरेदीचे व्यवहार सुरू केले होते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक व्यवहार ठप्प असताना सोने व चांदीचे दर वाढले होते. सोने 58 हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर प्रतिकिलो 80 हजार रुपयांच्या घरात गेले होते. वर्षभर सराफ बाजारात हाच ट्रेंड कायम राहिला. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे, बाजारपेठेत व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने गुंतवणूकदारांना सोने व चांदीच्या व्यतिरिक्त अन्य पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने 47 हजार रुपये प्रति तोळा तर चांदी 63 हजार रुपये प्रति किलोच्या घरात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याने सोने व चांदीच्या विक्रीचा मारा वाढला आहे. त्यामुळे दोन्ही धातूंचे दर अस्थिर आहेत.
हेही वाचा-सापाने दंश केल्याने व्यक्तीने सापाला घेतला चावा
आठवड्याच्या सुरुवातीला झाली होती मोठी घसरण-
जळगावचा सराफ बाजार देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिक आणि सोने व चांदीत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांच्या नजरा याठिकाणच्या व्यवहारांवर असतात. चालू आठवड्याच्या सुरुवातीला जळगावच्या सराफ बाजारात सोने व चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. सुवर्ण बाजारात सोमवारी (9 ऑगस्ट) चांदीचे दर अडीच हजाराने तर सोन्याचे दर 1 हजार 300 रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच, मंगळवारी (10 ऑगस्ट) पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली होती. सोने मात्र, 47 हजार 400 रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. पुढे बुधवार व गुरुवार हे दोन दिवस दोन्ही धातूंच्या दरात 300 ते 400 रुपयांनी चढउतार राहिला. आज, शुक्रवारी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 48 हजार 200 रुपये तर चांदीचे दर 3 टक्के जीएसटीसह 63 हजार 400 इतके नोंदविले गेले.
हेही वाचा-मुलीसमोर पित्याला मारहाण, मुलगी करतेय पित्याला सोडण्याची याचना; गुन्हा दाखल
जळगावच्या सराफ बाजारात उलाढाल वाढली-
सोने व चांदीचे दर कमी झाल्याने जळगावच्या सराफ बाजारात उलाढाल वाढली आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना बाफना ज्वेलर्सचे संचालक पप्पू बाफना यांनी सांगितले की, अलीकडे सोने व चांदीचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे हंगाम नसतांनाही ग्राहक दोन्ही धातूंच्या खरेदीला पसंती देत आहेत. लग्नसराई नसतानाही दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. एरवी जुलै-ऑगस्टचा काळ सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत. कोरोना नियंत्रणात असल्याने बाजारपेठ गजबजली आहे. त्यामुळे सराफ बाजारात एरवी होणाऱ्या उलढालीच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी उलाढाल वाढल्याचे पप्पू बाफना यांनी सांगितले.
सोने-चांदी पुन्हा उसळी घेणार-
जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, सोने व चांदीचे दर कमी असल्याने गुंतवणूकदारांना खरेदीची संधी चालून आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदारांची ही खेळी आहे. ते ज्यावेळी एखाद्या गोष्टीची सातत्याने विक्री करतात, तेव्हा त्या गोष्टीचे मूल्य घसरते. पण नंतर मूल्य वधारते. सोने व चांदीचे दर सतत घसरत आहेत. येत्या काही दिवसात सोने-चांदीचे दर पुन्हा वाढतील, असे संकेत आहेत. भविष्यात सोने दीड ते दोन हजाराने तर चांदी अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढू शकते, असा अंदाजही लुंकड यांनी यावेळी व्यक्त केला.
शेअर बाजाराने निर्देशांकाचा शुक्रवारी गाठला ऐतिहासिक टप्पा
भारतीय शेअर मार्केट मध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी दिसून आलेली आहे. परदेशात आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजी आली आहे. या तेजीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे सेन्सेक्सने प्रथमच। 55000 अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. दररोज नवनवे विक्रम करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीमुळे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत.
कोरोनाचा कमी झालेला धोका तसेच विविध टप्प्यावरील उद्योग क्षेत्रांमध्ये प्राप्त होणारी तेजी यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा गती निर्माण करत असल्याने याचा सकारात्मक बदल आगामी काळात होणारनअसल्याचे संकेत असून याचा भारतीय बाजाराला फायदा होणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. निफ्टी निर्देशांकांनी तेजीचा सूर कायम ठेवला आहे.