महाराष्ट्र

maharashtra

चिनी उत्पादनांवर भारतीय बहिष्कार घालणार का? वाचा, सर्वेक्षणातील माहिती

By

Published : Jun 20, 2020, 8:06 PM IST

गेल्या दहा वर्षात चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत मोठा विस्तार केला आहे. यामध्ये स्मार्टफोन, दूरसंचार उत्पादने, टेलिव्हिजन, होम अप्लायन्सेस, वाहनांचे सुट्टे भाग आणि औषधी घटक यांचा समाववेश आहे.

चिनी मालावर बहिष्कार
चिनी मालावर बहिष्कार

नवी दिल्ली- चीनविरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना नागरिकांमध्ये चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची भावना निर्माण होत आहे. अशा स्थितीत केलेल्या एका सर्वेक्षणात 97 टक्के लोकांनी चीनच्या विविध ब्रँडवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या दहा वर्षात चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत मोठा विस्तार केला आहे. यामध्ये स्मार्टफोन, दूरसंचार उत्पादने, टेलिव्हिजन, होम अप्लायन्सेस, वाहनांचे सुट्टे भाग आणि औषधी घटक यांचा समाववेश आहे.

  • सर्वेक्षणात 87 टक्के भारतीयांनी चिनी उत्पादनांवर एक वर्षापर्यंत बहिष्कार टाकण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. सीमारेषेवर भारत-चीनमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ही भूमिका असल्याचे सांगितले.
  • 78 टक्के नागरिकांनी चीनच्या उत्पादनांवर 200 टक्के आयात शुल्क लागू करण्यासाठी सरकारला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.
  • भारतामधील उत्पादनांना बीआयए, एफएसएसएआय अशी विविध मान्यता घ्याव्या लागतात. तसेच नियम चिनी उत्पादकांना लागू करावे, असे सर्वेक्षणातील 90 टक्के लोकांनी म्हटले आहे.
  • शिओमी, विवो, ओप्पो, वूईचॅट व टिकटॉक अशा ब्रँडवर तत्काळ बहिष्कार टाकणार असल्याचे 58 टक्के नागरिकांनी सांगितले. तर 39 टक्के लोकांनी सध्या खरेदी केल्याने वापरणार असल्याचे सांगितले. पण पुन्हा खरेदी करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले.
  • सर्वेक्षणामधून 97 टक्के लोकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची इच्छा असल्याचे सांगितले. लोकलसर्कल्सने देशातील 235 जिल्ह्यांमध्ये 32 हजार जणांना सर्वेक्षणातून प्रश्न विचारले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details