महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आयबीजेच्या मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदीचा धुमधडाका; 100 किलो सोन्यासह 600 किलो चांदीची विक्री - चांदी विक्री

आयबीजेएच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोने हे प्रति तोळा 38 हजार 666 रुपयांनी विकले गेले. तर धनत्रयोदशीला सोन्याला प्रति तोळा  38,725 रुपये भाव मिळाला होता.

संग्रहित - सोने -चांदी विक्री

By

Published : Oct 28, 2019, 7:20 PM IST

मुंबई - नव्या हिंदू वर्षाच्या मुहूर्तावर इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशनने (आयबीजीए) आज विशेष मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन केले. या मुहूर्ताच्या दीड तासात 100 किलो सोने आणि 600 किलो चांदीची विक्री झाली.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेश मेहता म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत सोने आणि चांदी अधिक किमतीने विकण्यात आले. धनत्रयोदशीच्या तुलनेत सोने कमी किमतीत विकले गेल्याचे त्यांनी सांगितले. आयबीजेएच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोने हे प्रति तोळा 38 हजार 666 रुपयांनी विकले गेले. तर धनत्रयोदशीला सोन्याला प्रति तोळा 38,725 रुपये भाव मिळाला होता.


हेही वाचा-'इतना सन्नाटा क्यों है भाई', मंदीवरून शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

चांदीला धनत्रयोदशीहून प्रति किलो 24 रुपये भाव कमी मिळाला आहे. विशेष मुहूर्तावर चांदी प्रति किलो हे 46 हजार 751 रुपये भाव मिळाला आहे. या विशेष मुहूर्ताचे सकाळी 11 वाजून 56 मिनिटे ते 12 वाजून 28 मिनिटे या वेळेत आयोजन करण्यात आले. या मुहूर्तामध्ये 100 किलो सोने आणि 600 किलो चांदीची विक्री झाल्याचे मेहता यांनी सांगितले. तर आयबीजेएच्या माहितीनुसार धनत्रयोदशीला 30 किलो सोन्याची विक्री झाली होती.

हेही वाचा-ग्राहकाची वाहन खरेदीची हौस भारी; चार पोत्यांमधील नाणी मोजताना कामगारांची दमछाक

दिवाळी पाडव्यामुळे आज भारतीय शेअर बाजार बंद राहिला आहे. याशिवाय घाऊक कमोडिटी बाजार, मेटल आणि बुलियन, फॉरेक्स आणि कमोडिटी फ्युचर मार्केट हे आज बंद राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details