नवी दिल्ली - सरकारी आकडेवारीनुसार घाऊक बाजारपेठेतील किंमत निर्देशांक जुलैनंतर बदलला नाही. हा किंमत निर्देशांक जुलैप्रमाणेच ऑगस्टमध्येही १.०८ टक्के नोंदण्यात आला आहे.
किरकोळ बाजारपेठेतील महागाई भडकल्यानंतर घाऊक बाजारपेठेतील दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक हा ४.६२ टक्के होता. बिल्ट अप इन्फलेशन हा मागील महागाईचा वर्तमानकाळातील महागाईवर झालेला परिणाम असतो. हा महागाईचा दर १.२५ टक्के राहिला आहे. तर गतवर्षी या महागाईचा दर ३.२७ टक्के होता.
- अन्न घटकांचा (फूड आर्टिकल्स) महागाईचा दर हा जुलैच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी वाढला आहे.
- कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्देशांकात १.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारपेठेत महागाईचा भडका, गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांकाची नोंद