नवी दिल्ली - देशाच्या सातव्या आर्थिक जनगणनेसाठी राज्यपातळीवरील प्रशिक्षकांना उद्यापासून दिल्लीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील प्रशिक्षणानंतर जनगणना करणारे कर्मचारी माहिती गोळा करणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय आणि अंमलबजावणी संचालनालय नियोजन करत आहे.
आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी प्रशिक्षकांना ६ जूनला नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यापूर्वी आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना राष्ट्रीय प्रशिक्षण १४ मे रोजी देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये आर्थिक सर्वेक्षणातील विविध संकल्पना, व्याख्या, प्रक्रिया, डिजीटल माध्यमाच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. याचप्रकारचे प्रशिक्षण हे राज्य आणि जिल्हापातळीवर देण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रगणक हे माहिती गोळा करणे आणि त्याचे पर्यवेक्षण करणार आहेत.