नवी दिल्ली - सरकारकडून भारतीय सीमा शुल्क हे उद्योगानुकूलता आणि व्यापार सुविधा केंद्र करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन २६ जानेवारीला जगभरात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सीमा शुल्क अधिकारी हे लोकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. तसेच विभागातील कामकाजात महत्त्वाचे बदल घडत आहेत. जागतिक सीमाशुल्क संस्थेने यंदा 'सीमा शुल्काची वसूली, नुतनीकरण आणि पुरवठा साखळी बळकट आणि शाश्वत करणे' ही संकल्पना निश्चित केली आहे. भारताच्या विकासासाठी आणि सीमा शुल्क विभागासाठी सुरक्षित पुरवठा साखळी महत्त्वाची आहे. त्यासाठी भारतीय सीमा शुल्क विभागाकडून आघाडीवर काम करण्यात येत आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात दिवसाखेर ९३८ अंशांची पडझड; निफ्टी १४,०००हून खाली