नवी दिल्ली- देशातील आर्थिक स्थितीची माहिती देणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात विकिपिडीयाच्या स्त्रोताचा वापर केला. यावर नेटीझन्सनेचा पुढच्या टप्प्यात व्हॉट्सअॅपचा वापर कधी करणार असा सवाल उपस्थित केला आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालायाने आर्थिक पाहणी अहवाल हा शुक्रवारी सादर केला. या अहवालात विकिपिडियाचा स्त्रोत म्हणून उल्लेख करण्यात आला. पुढील वेळेस व्हॉट्सअॅपचा वापर होईल, असे एका नेटिझन्सने म्हटले आहे. विकिपिडिया हा स्वयंसेवी लोकांनी तयार केलेला स्त्रोत आहे. हा स्त्रोत देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी होत असल्याने नेटिझन्स टीका करत आहेत.