नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेतील महागाईत सप्टेंबरमध्ये घसरण झाली आहे. घाऊक बाजारपेठेतील महागाई सप्टेंबरमध्ये ०.३३ टक्के झाली आहे. ऑगस्टमध्ये ही महागाई १.०८ टक्के होती. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत अन्नधान्य गटातील महागाई ही सप्टेंबरमध्ये ०.४ टक्क्यांनी घसरली आहे. फळे आणि भाजीपाल्यांचे दर घसरल्याने हा परिणाम झाला आहे. बिगर अन्नधान्य गटातील महागाई ही २.५ टक्क्यांनी घसरली आहे. मिनरल्स गटातील महागाई ही ६.६ टक्क्यांनी वाढली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू गटात महागाई ही १.९ टक्क्यांनी घसरली आहे. कच्च्या तेलाचे दर घसरल्याने ही महागाई कमी झाली आहे.