नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेमधील महागाई पाठोपाठ घाऊक बाजारपेठेमधील महागाई कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. घाऊक बाजारपेठेमधील महागाई जुनच्या तुलनेत जुलैमध्ये कमी झाली आहे. हे प्रमाण १.०८ टक्के झाले आहे.
कच्च्या तेलाचे दर आणि कमी झालेल्या अन्नाच्या दरामुळे घाऊक बाजारपेठेमधील महागाई कमी झाली आहे. वार्षिक महागाईचा दर हा घाऊक महागाई निर्देशांकावर आधारित असतो. जुलैमध्ये ही महागाई १.०८ टक्के तर गतवर्षी २.०२ टक्के महागाई होती. अन्नधान्याच्या किमती जुलैमध्ये ६.१५ टक्के होत्या. तर अन्नधान्याच्या किमती जुनमध्ये ६.९८ टक्के महागाई होत्या. ही आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.