नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेमधील महागाईत सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये अंशत: घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई ही ०.१६ टक्के राहिला आहे. तर सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई ही ०.३३ टक्के राहिली आहे.
बिगर अन्नघटकांच्या किमती घसरल्याने घाऊक बाजारपेठेमधील महागाई कमी झाली आहे. तसेच उत्पादित मालाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यानेही महागाई कमी झाली आहे.
- ऑक्टोबरच्या घाऊक महागाई निर्देशांकानुसार चालू वर्षात वार्षिक महागाई ही ५.५४ टक्के राहिली आहे.
- बिगर अन्नपदार्थांसह असलेल्या वस्तुंची महागाई २.३५ टक्के राहिली आहे. तर अन्नपदार्थांच्या वर्गवारीतील महागाई ही ९.८० टक्के राहिली आहे.
- औद्योगिक उत्पादनांची महागाई ही ऑक्टोबरमध्ये ०.८४ टक्क्यांनी कमी झाली आहे.
- ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.