नवी दिल्ली/दावोस- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे उपपंतप्रधान शी जिनपिंगसह जगभरातील आघाडीचे नेते उद्या दावोस परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. हे परिषद जागतिक आर्थिक मंचाने आयोजित केली आहे. ही परिषद सहा दिवस सुरू राहणार आहे.
चालू आर्थिक वर्षात जागतिक आर्थिक मंचाची दावोस येथील परिषद सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. या परिषदेला १ हजारांहून अधिक नेते उपस्थित राहणार आहे. या परिषदेत विविध देशांचे प्रमुख, मोठ्या कंपन्यांचे सीईओ आणि चेअरमन तसेच विविध संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत आर्थिक, पर्यावरण, सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या आव्हानांवर चर्चा होणार आहे.