हैदराबाद - येस बँक आणि लक्ष्मी विलास बँकेमध्ये काय घडत होते, याची आम्हाला पूर्ण जाणीव होती, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. ते आरबीआयचे पतधोरण जाहीर केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
गेल्या आठ महिन्यात लक्ष्मी विलास बँक आणि येस बँक या दोन बँका ढासळल्या आहेत. त्यामुळे आरबीआयची बँकांवरील पर्यवेक्षणाची यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे विचारले असता आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की केवळ ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी नियामक संस्थेकडून हस्तक्षेप करण्यात येतो. ते एकाच दिवशी सकाळी घडलेले नाही. काय घडत होते, याची आम्हाला माहिती होती. आम्ही प्रथम बँकांच्या व्यवस्थापनाबरोबर काम करण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. गेल्या दोन वर्षात बँकांवरील पर्यवेक्षण अधिक बळकट केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बळकट करण्यासाठी आरबीआयने अभूतपूर्व पावले उचलली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आयटीसह विविध यंत्रणाचा वापर केला आहे. जर ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्याची गरज दिसत असेल, तेव्हाच हस्तक्षेप करतो.
हेही वाचा-'डिजीटल बँकिंगवरील ग्राहकांचा विश्वास टिकविणे गरजेचे असल्याने एचडीएफसी बँकेवर कारवाई'