महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोना महामारीने महासत्ता अमेरिकेची अर्थव्यवस्था आजारी; विकासदरात मोठी घसरण - US economy shrinks 33 percent

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. तर दहा दशलक्षहू अधिक नागरिकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. यांचा एकत्रित परिणाम होवून अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण हे 14.7 टक्के झाल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 30, 2020, 7:37 PM IST

वॉशिग्टंन– कोरोना महामारीचा उद्रेक सुरू असतानाच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदराला मोठे खिंडार पडले आहे. वार्षिक विकासदराच्या तुलनेत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा एप्रिल-जूनमध्ये विकासदर हा 33 टक्क्यांनी घसरला आहे. ही 1958 नंतर तिमाहीमधील सर्वात मोठी घसरण आहे.

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. तर दहा दशलक्षहू अधिक नागरिकांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. यांचा एकत्रित परिणाम होवून अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण हे 14.7 टक्के झाल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नात मोठी घसरण होईल, असा वाणिज्य विभागाचा अंदाज आहे. ही घसरण अमेरिकेतील 1947 नंतरची सर्वात मोठी घसरण असणार आहे. यापूर्वी अमेरिकेमध्ये 1958 मधील तिमाहीत सर्वाधिक 10 टक्क्यांची घसरण झाली होती. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत जानेवारी-मार्चच्या तिमाहीत 5 टक्क्यांची घसरण झाली होती. तेव्हा कोरोनाच्या विषाणुचा प्रार्दुभाव सुरू झाला असताना मंदीचीही सुरुवात झाली होती. या मंदीनंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या गेल्या 11 वर्षांच्या वाढत्या विकासदराला ब्रेक लागला आहे.

मागील तिमाहीत व्यवसामधील गुंतवणूक आणि घरांच्या खरेदीत मोठी घसरण झाली आहे. सरकारी महसुलात मोठी घसरण झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात झाली आहे. सतत 18 व्या आठवड्यात 1 दशलक्षहून अधिक नोकरी गमाविलेल्या नागरिकांनी सरकारकडे मदतीसाठी अर्ज केले आहेत. असे असले तरी एक तृतीयांश गमाविलेल्या नोकऱ्या पुन्हा पुर्ववत सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नोकऱ्यांची चिंता कायम राहिली आहे.

कोरोनाचे संकट असतानाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा उद्योग सुरू करण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तर कोरोनामुळे सेवा क्षेत्रातील कामगार आणि ग्राहकांना धोका वाटत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details