महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ-केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

कृषी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्यात येत आहे. येत्या काळातही कृषी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर

By

Published : Jun 9, 2021, 4:34 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने 2021-22 वर्षाकरिता तांदळाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल 72 रुपयांनी वाढवून 1,940 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी तांदळाची किंमत प्रति क्विंटल 1,868 रुपये करण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. ते म्हणाले, की तूर डाळीची किमान आधारभूत किंमत पुढील मार्केटिंग वर्षासाठी 62 टक्क्यांनी वाढविली आहे. तर उडीद डाळीची किंमतही 65 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. कृषी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्यात येत आहे. येत्या काळातही कृषी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्यात येणार आहे.

हेही वाचा-'या' शहरात पेट्रोलनंतर डिझेल दराचे गाठणार शतक

कृषी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

रेल्वेला 5 मेगाहार्टझ स्पेक्ट्रमची मंजुरी-

केंद्रीय मंत्रिमंडळाने 700 मेगाहार्टझ बँडमधील (4जी स्पेक्ट्रम) 5 मेगाहार्टझ स्पेक्ट्रम वापरण्याची भारतीय रेल्वेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे संवाद व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. प्रवाशांना प्रवास करणे अधिक सुरक्षित होणार आहे. रेल्वेकडून सध्या ऑप्टिकल फायबरचा वापर करण्यात येत आहे. स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्याने रेडिओ कम्युनिकेशन उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-ह्युंदाई अलकाजार एसयूव्हीची बुकिंग आजपासून सुरू

येत्या 5 वर्षात रेल्वेतील 5 जी स्पेक्ट्रमच्या सिग्नल मॉडरेनायझेशनसाठी 25,000 हजार कोटी रुपये लागणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details