नवी दिल्ली- कोरोना महामारीत देशाच्या राजधानीत बेरोजगारीने उच्चांक गाठून ४५. ६ टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी मुंबईस्थित सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) संस्थेने दिली आहे.
सीएमआयईच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ मधील बेरोजगारीचे प्रमाण २७.३ टक्क्यांवरून मे महिन्यात ४५.६ टक्के झाले आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या महिन्यात देशाच्या राजधानीत बेरोजगारीचा दर वाढला आहे.
हेही वाचा-अदार पुनावाला यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांसह परराष्ट्रमंत्र्यांचे मानले आभार, कारण...
सीएमआयईच्या अहवालात काय म्हटले?
- फेब्रुवारी २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर ८ टक्के होता.
- आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचा दर हा दिल्लीत सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ बेरोजगारीचे प्रमाण हरियाणात २९.१ टक्के, तामिळनाडूमध्ये २८ टक्के आणि राजस्थानमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २७.६ टक्के आहे.
- याच काळात आसाममध्ये बेरोजगारीचे प्रमाण देशात सर्वात कमी म्हणजे ०.१ टक्के आहे.
- गुजरातमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २.३ टक्के, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५.३ टक्के आहे.
- देशामध्ये मे महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण ११.९० टक्के राहिले आहे.
- शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण १४.७३ टक्के आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण १०.६३ टक्के राहिले आहे.
- गतवर्षी डिसेंबरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ९.०६ राहिले आहे. या बेरोजगारीचे प्रमाण घसरून मार्चमध्ये ६.५० टक्के झाले आहे.
हेही वाचा-आरबीआयकडून 4 टक्के रेपो दर 'जैसे थे'
आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेच्या (आयएलओ) माहितीनुसार बेरोजगारीचा दर म्हणजे बेरोजगार व्यक्ती आणि एकूण मनुष्यबळातील बेरोजगार व्यक्तींचे प्रमाण असते.