महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशातील बेरोजगारीचा दर २०१७-१८ मध्ये ६.१ टक्के - संतोष गंगवार

कामगार मनुष्यबळाचे सर्वेक्षण नव्याने करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत दिली. या नव्या सर्वेक्षणात नवे निकष आणि नमुन्यांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

By

Published : Feb 5, 2020, 5:45 PM IST

Employment
रोजगार

नवी दिल्ली - नव्या सर्वेक्षणानुसार देशातील बेरोजगारीचा दर हा २०१७-१८ मध्ये ६.१ टक्के राहिला आहे. ही माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत दिली.


कामगार मनुष्यबळाचे सर्वेक्षण नव्याने करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत दिली. या नव्या सर्वेक्षणात नवे निकष आणि नमुन्यांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्वेक्षणाची पूर्वीच्या सर्वेक्षणाबरोबर तुलना होवू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले. ते प्रश्नोत्तर तासामध्ये बोलत होते.

नव्या सर्वेक्षणानुसार कामगार मनुष्यबळाने ३६.९ टक्के सहभाग घेतला आहे. या सर्वेक्षणामधून अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. गंगवार म्हणाले, पायाभूत विकास, उद्योगानुकलता आणि भारताची जगात स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा-बँकिग क्षेत्रातील मोठा निर्णय; रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करणार सहकारी बँकांचे नियमन

देशाचे उद्योगानुकलतेच्या मानांकनात २०१९ मध्ये ६३ वे स्थान राहिले आहे. यापूर्वी देशाचा १९६ वा स्थान होते. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आमचे सरकार सजग आहे. रोजगार निर्मितीसाठी सरकार विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे. ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, त्यामधून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. तरुणांना नोकऱ्या मिळत असल्याचाही त्यांनी दावा केला. कौटुंबिक माहिती संकलित करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत माहिती घेण्यासाठी ग्रामीण भागातूनही माहिती संकलित केली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-कोरोनाचा परिणाम; चीनला होणारी कापूस निर्यात ठप्प; शेतकरी संकटात

ABOUT THE AUTHOR

...view details