महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'दर कपातीचा फायदा देण्याच्या प्रमाणात आणखी सुधारणा होईल' - RBI governor

दर कपातीचा फायदा देण्याचे प्रमाण हे सावकाश आणि स्थिरगतीने सुधारत असल्याचे शक्तिकांत दास यांनी माध्यमांना सांगितले. यामध्ये आणखी सुधारणा होईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

Nirmala Sitaraman, Shaktikant Das
आरबीआय संचालक बैठकीनंतर शक्तिकांत दास, निर्मला सीतारामन

By

Published : Feb 15, 2020, 2:11 PM IST

नवी दिल्ली- येत्या काही दिवसात दर कपातीचा फायदा वेगाने देण्यात येईल, अशी अपेक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. यामुळे कर्ज पुरवठ्यात वाढ होईल, असेही ते म्हणाले. ते आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर बोलत होते.

दर कपातीचा फायदा देण्याचे प्रमाण हे सावकाश आणि स्थिरगतीने सुधारत असल्याचे शक्तिकांत दास यांनी माध्यमांना सांगितले. यामध्ये आणखी सुधारणा होईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. येत्या काही महिन्यांत कर्ज पुरवठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. महागाईचे वाढते प्रमाण आणि जागतिक वातावरणातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर आरबीआयने हा निर्णय घेतला होता. बँकांकडून कृषी क्षेत्राला होणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यात येत होत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-'आधार'ला पॅन कार्ड लिंक नसेल तर होणार बंद; 'या' तारखेपर्यंत शेवटची मुदत

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केला तर बँकांकडूनही साधारणत: कर्जाचे व्याजदर कमी करण्यात येतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरशी संलग्न कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details