महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

तंबाखूने अर्थव्यवस्थेला 'चुना' नव्हे तर आर्थिक फायदा, संशोधन संस्थेचा अहवाल - economic value

देशातील ६० लाख शेतकऱ्यांसह ४.५७ कोटी लोकांचा उदरनिर्वाह तंबाखूवर अवलंबून आहे. असे असले तरी तंबाखूमुळे दरवर्षी कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांची मोठी संख्या देशात आहे.

तंबाखू

By

Published : May 29, 2019, 5:44 PM IST

Updated : May 29, 2019, 6:48 PM IST

नवी दिल्ली - तंबाखू क्षेत्र हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला योगदान देणारे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. तंबाखू क्षेत्रातने ११ हजार ७९ कोटी ४९८ रुपयांचे अर्थव्यवस्थेला योगदान दिल्याचे तारी या संशोधन संस्थेने म्हटले आहे.


तंबाखू उद्योगाबाबत संशोधन केलेला अहवाल थॉट आर्बिट्रेज रिसर्च इन्स्टिट्यूटने (टीएआरआय) असोचॅम या उद्योगांच्या शिखर संस्थेकडे सादर केला आहे. व्यापारी पिकांमधून अर्थव्यवस्थेला योगदान देणाऱ्या व्यापारी पिकांमध्ये तंबाखूचे लक्षणीय योगदान आहे. त्यातून सामाजिक, आर्थिक फायदे होतात. तसेच कृषी क्षेत्रात रोजगार, कृषी उत्पन्न, महसूल निर्मिती आणि विदेशी चलनही मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.


असे आहे तंबाखू क्षेत्रात मनुष्यबळ-
देशातील ६० लाख शेतकऱ्यांसह ४.५७ कोटी लोकांचा उदरनिर्वाह तंबाखूवर अवलंबून आहे. त्यामध्ये दोन कोटी मजूर, पाने गोळा करणारे ४० लाख आणि प्रक्रिया, उत्पादन आणि निर्यातीत ८५ लाख जण काम करतात. तर ७२ लाख जण तंबाखूची किरकोळ विक्री आणि व्यापारात आहेत. असे असले तरी तंबाखूमुळे दरवर्षी कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांची देशात संख्याही अधिक आहे.

Last Updated : May 29, 2019, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details