नवी दिल्ली - रेल्वेला कामकाज चालविण्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे. रेल्वेच्या १५.५ लाख माजी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनापोटी ५० हजार कोटी रुपये द्यावे लागतात. यामुळे आर्थिक ताण येत असल्याने रेल्वेने वित्त मंत्रालयाकडे निवृत्ती वेतन निधीची मागणी केली आहे.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव म्हणाले, रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २५ टक्के उत्पन्न हे निवृत्ती वेतनाला जाते. हे ५० हजार कोटी रुपये देण्यासाठी रेल्वेने वित्त मंत्रालयाला विनंती केली आहे. रेल्वे सुमारे १२.५ लाख कर्मचाऱ्यांना वेतन देते. त्यासाठीही रेल्वेच्या उत्पन्नाचा मोठा भाग खर्च होतो. रेल्वेला मिळणारे उत्पन्न आणि कामकाजाचा खर्च यांचा मेळ लावण्यासाठी यंदा कठीण स्थिती असल्याचेही व्ही. के. यादव यांनी मान्य केले.
हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या भाषणात 'या' वापरण्यात येतात महत्त्वाच्या संज्ञा, जाणून घ्या अर्थ