मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेत तीन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. ही माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पीएमसी बँकेला मिळालेल्या ऑफरचे मुल्यांकन करण्यात असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे मुल्यांकन झाल्यानंतर पीएमसी आरबीआयशी संपर्क साधणार असल्याचे दास यांनी सांगितले. पीएमसीचे प्रशासक ए. के. दिक्षीत यांनी तीन गुंतवणुकदारांनी १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळा दिला असल्याचे मागील महिन्यात सांगितले होते. गुंतवणुकदारांनी बँकेची स्थिती माहित असणे आवश्यक आहे. गुंतवणुकदारांची ऑफर स्वीकारण्यापूर्वी काळजी घेत असल्याचेही दिक्षीत यांनी म्हटले होते.