मुंबई- कोरोनाच्या लढ्यात सरकारकडील आर्थिक स्त्रोत मर्यादित राहिला आहे. अशा स्थितीत वरिष्ठ प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी अतिश्रीमंतावर प्राप्तिकर ३० टक्क्यांवरून ४० टक्के करावा, अशी शिफारस केली आहे. तर विदेशी कंपनीवर उच्च उपकर लागू करावा, असेही शिफारस केली आहे. कोरोनाच्या लढ्यात तात्पुरत्या सुधारणा करण्यांसाठी या शिफारसी अधिकाऱ्यांनी एका अहवालात केल्या आहेत.
करातील दिलासा केवळ प्रामाणिक आणि नियमांचे पालन करणाऱ्या करदात्यांना द्यावी, अशी अपेक्षा अहवालात व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा व निवृत्त कर्मचाऱ्यांचा वाढीव महागाई भत्ता न देण्याचा निर्णय घेतला. यामधून सरकारचे ३७ हजार कोटी रुपयांचे वाचू शकणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.