महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

परवडणाऱ्या घरांसाठी 'टॅक्स हॉलीडे' ची मुदत एक वर्ष वाढवणार - अर्थमंत्र्यांचा प्रस्ताव

परवडणाऱ्या घरांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अतिरिक्त 1.5 लाखांचे कर सवलतीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती दिली. यासंबधी मुदत 2021 पर्यंत वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांना तसेच गृहनिर्माण क्षेत्राला दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

Budget 2020 Latest News
परवडणाऱ्या घरांसाठी 'टॅक्स होलीडे' ची मुदत एक वर्ष वाढवणार - अर्थमंत्र्यांचा प्रस्ताव

By

Published : Feb 1, 2020, 4:12 PM IST

नवी दिल्ली - सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अतिरिक्त 1.5 लाखांचे कर सवलतीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती दिली. यासंबधी मुदत 2021 पर्यंत वाढवण्यात आल्याने सर्वसामान्यांना तसेच गृहनिर्माण क्षेत्राला दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी सरकारने संबंधित मुदत पुढे ढकलली आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

जाणून घ्या गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल

  • गृहनिर्माण प्रोजेक्टमध्ये सामान्यांना घरे घेण्यासाठी डेव्हलपर्सकडून आकारण्यात येणाऱ्या नफ्यावरील आवश्यक टॅक्स हॉलीडेची मुदत एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे.
  • यासाठी केंद्राने अतिरिक्त 1.5 लाखांच्या सवलतीचा प्रस्ताव ठेवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details