नवी दिल्ली- बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची आयजीएसटी (एकत्रित वस्तू व सेवा कर) मंत्रिगटाच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी आयजीएसटी मंत्रिगटाच्या संयोजकपदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे जबादारी होती.
केंद्र सरकारने आयजीएसटीच्या मंत्रिगटाच्या संयोजकपदातील बदलाची अधिसूचना मंगळवारी उशीरा रात्री काढली. या मंत्रिगटावर राज्यांच्या कर संकलनाची समस्या सोडविण्याची जबाबदारी आहे. त्याबाबत मंत्रिगट सीतारामन यांच्याकडे शिफारसी करणार आहे. आयजीएसटी मंत्रिगटाचे संयोजक सुशील मोदी यांना जीएसटीचे संकलन वाढविण्यासाठी शिफारसी कराव्या लागणार आहेत. आयजीएसटीच्या मंत्रिगटात राज्यांसह केंद्र सरकारचे मंत्री व अधिकारी आहेत.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ७४ अंशाने वधारला; खासगी बँकेसह वित्तीय कंपन्यांचे शेअर तेजीत