महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आरबीआयचे १२ फेब्रुवारीचे परिपत्रक घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे - RBI circular

आरबीआय ही कायद्याची मर्यादा ओलांडून  अधिक अधिकार दाखवित असल्याची सर्वोच्च न्यायालयाने निकालात टिप्पण्णी केली आहे.

सर्वोच्च न्यायालय

By

Published : Apr 2, 2019, 4:06 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयवर ताशेरे ओढले आहेत. आरबीआयने १२ फेब्रुवारीला काढलेले नादारी प्रक्रियेबाबतचे परिपत्रक हे घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

२ हजार कोटींहून अधिक कर्ज थकित असलेल्या प्रकरणाबाबत तोडगा काढण्यासाठी १८० दिवसांची शेवटची मुदत देणारे आरबीआयने परिपत्रक काढले होते. तोडगा निघाला नाही तर बँक अथवा कर्जदारांनी दिवाळखोरी आणि नादारी कायद्याअंतर्गत नादारीसाठी (insolvency) अर्ज करावा, असे आरबीआयने आदेश दिले होते. कापड उद्योग, उर्जा क्षेत्र, साखर आणि जहाजबांधणी उद्योग आणि साखर उद्योगाला समोर ठेवून हा निर्णय लागू करण्यात आला होता.

आरबीआयच्या परिपत्रकाविरोधात उर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी सुरुवातीला अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ११ सप्टेंबरला उर्जा, साखर आणि जहाजबांधणी कंपन्यांच्या याचिका वेगवेगळ्या न्यायालयात वर्ग केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय देईपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले होते.

आरबीआय ही कायद्याची मर्यादा ओलांडून अधिक अधिकार दाखवित असल्याची सर्वोच्च न्यायालयाने निकालात टिप्पण्णी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details