नवी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज(बुधवार) पत्रकार परिषद घेत मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील तरतुदी जाहीर केल्या. यामध्ये प्रामुख्याने सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना कोरोनामुळे आलेल्या मंदीतून बाहेर काढण्यासाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. तर भविष्य निर्वाह निधीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्योगांच्या हातात पैसा राहावा म्हणून भविष्य निर्वाह निधी आता सरकार भरणार आहे.
भविष्य निर्वाह निधीबाबत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा - अर्थ मंत्रालय पत्रकार परिषद
उद्योग आणि नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीचा भार उचलणार आहे.
उद्योग आणि नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीचा भार उचलणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे १२ टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे. त्यामुळे कंपन्यांकडे जास्तीचा पैसा उपलब्ध होणार आहे.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांपर्यंतची ही योजना होती. मात्र आता पुढचे तीन महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही सरकारच पीएफचा पैसे भरणार आहे. ३.६७ लाख कंपन्या आणि ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. यामुळे उद्योगांना २५०० कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध होणार आहे.