नवी दिल्ली - येत्या काही महिन्यांत राज्यांना मिळणाऱ्या जीएसटीच्या संकलनात सुधारणा होईल, असा विश्वास केंद्रीय वित्तीय सचिव अजय भूषण पांडे यांनी व्यक्त केला. कर संकलनात वार्षिक १६.६७ टक्के वाढ होईल, हे वस्तुस्थितीला अनुसरुण असल्याचेही पांडे यांनी सांगितले.
केंद्रीय वित्तीय सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम वार्षिक २.५ लाख रुपयांहून अधिक असेल तर त्यापासून मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर लागू होणार आहे. त्यामागे विसगंती दूर करणे हा हेतू आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना पीएफवर वार्षिक ८ टक्क्यांहून अधिक व्याज मिळणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न २५ लाखांहून अधिक असेल तर त्यापैकी १२ टक्के रक्कम कर्मचारी ही विनाकर जमा करू शकतात.
हेही वाचा-सलग दुसऱ्यांदा एलआयसीला ग्रुप योजनेतून मिळाला १ लाख कोटींहून अधिक विमा हप्ता