मुंबई - कर्जवृद्धीचा दर कमी असणे हे बँकिंग क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते मिंट वार्षिक बँकिंग मेळाव्यात बोलत होते.
सध्या बँकिंग व्यवस्थेत कर्जवृद्धीचा दर सुमारे ७ टक्के आहे. कर्ज पुरेशा प्रमाणात देणे आणि गुणवत्तेची कर्ज प्रकरणे मंजूर करणे यावर शक्तिकांत दास यांनी भाषणात भर दिला. पुढे ते म्हणाले, वित्तीय संस्थांच्या आकडेवारीचे परीक्षण प्रस्तावित आहे. आघाडीच्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची जवळून देखरेख केली जात आहे. गेल्या वर्षभरात छोट्या एनबीएफसीकडील कर्जाचा पुरवठा सुधारला आहे. कर्जाचा पुरवठा हा स्थिर आहे. त्यामध्ये हळूहळू स्थिरपणे सुधारणा होत आहे.
हेहे वाचा-सोन्याच्या किमतीने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; जाणून घ्या वाढलेले दर