नवी दिल्ली- भारत-चीनमध्ये आजपासून तीन दिवसांच्या रणनीतीपूर्ण आर्थिक संवादाची सुरुवात झाली आहे. संवादाच्या चर्चेच्या सहाव्या फेरीदरम्यान पायाभूत क्षेत्र, उर्जा आणि औषधी उत्पादने या क्षेत्रांवर चर्चा करण्यात येणार आहे.
चीन व भारतामध्ये संयुक्तपणे स्थापन झालेल्या पायाभूत, उर्जा, उच्च तंत्रज्ञान, स्त्रोतांचे संवर्धन या विषयांवरील गटामध्ये संवाद होणार आहे.
भारताच्या बाजूने नीती आयोगाचे चेअरमन तर चीनच्या बाजूने राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे (एनडीआरसी) चेअरमन हे त्यांच्या गटांचे नेतृत्व करणार आहेत. दोन्ही देशांचे उद्योग प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञदेखील चर्चेत सहभागी होणार आहेत. अशा प्रकारचा द्विपक्षीय संवाद वर्षातून एकदा दिल्ली अथवा बीजिंगमध्ये होत असतो.