नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची आज बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांसह लशीवरील जीएसटी कपातीबाबत निर्णय होणार आहे.
जीएसटी परिषदेच्या २८ मे रोजीच्या बैठकीत मंत्रिस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही समिती पीपीई किट्स, मास्क आणि लस यावरील जीएसटी दराबाबत नेमलेली मंत्रिस्तरीय समितीची जीएसटी परिषदेला शिफारशी करणार आहे. हा शिफारशींचा अहवाल मंत्रिस्तरीय समिती जीएसटी परिषदेला ७ जूनला सादर करणार होती.
हेही वाचा-आयएल अँड एफएसमध्ये १ लाख कोटींचा घोटाळा; चेअरमन पार्थसारथीला चेन्नई पोलिसांकडून अटक
मंत्रिस्तरीय समिती ही करणार शिफारस
पल्स ऑक्सीमीटर, हँड सॅनिटायझर, ऑक्सिजन थेरपनी, कॉन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, एन-१५ आणि सर्जिकल मास्क या वस्तुंवरील जीएसटी दर कमी करावे की त्यांना जीएसटीमधून वगळावे, याबाबत मंत्रिस्तरीय समिती निर्णय घेणार आहे. तसेच समिती कोरोना लस, कोरोना निदान किट यावरील जीएसटी दराबाबतही जीएसटी परिषदेला शिफारस करणार आहे. यापूर्वीच जीएसटी परिषदेने ब्लॅक फंग्सवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरीसीन बी या औषधाला जीएसटीमधून वगळून कोरोना रुग्णांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनसह फ्लिपकार्टचा सीसीआयकडून होणार तपास; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका