महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अर्थव्यवस्थेचा विकासदर शून्य नव्हे उणे १० टक्के राहील - पी. चिदंबरम

काँग्रेसचे नेते आणि पी. चिदंबरम ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षात विकासदर शून्य टक्के राहिल असा अंदाज केला आहे. तर पुढील आर्थिक वर्षात विकासदराला चालना मिळेल, असे म्हणणे म्हणजे अंधारात शिटी वाजविण्यासारखे आहे.

संपादित
संपादित

By

Published : Oct 27, 2020, 7:04 PM IST

हैदराबाद- अर्थव्यवस्थेचा विकासदर जवळपास शून्य टक्के राहणार असल्याच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अंदाजावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आक्षेप घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात विकासदर उणे १० टक्के राहील, असा अंदाज चिदंबरम यांनी केला. तसेच त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अंदाजित आकेडवारी अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित केले.

काँग्रेसचे नेते आणि पी. चिदंबरम ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की अर्थमंत्र्यांनी चालू आर्थिक वर्षात विकासदर शून्य टक्के राहिल असा अंदाज केला आहे. तर पुढील आर्थिक वर्षात विकासदराला चालना मिळेल, असे म्हणणे म्हणजे अंधारात शिटी वाजविण्यासारखे आहे. त्यांच्या स्वत:च्या जीडीपीच्या आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये विकासदर उणे दहा टक्के राहणार आहे. जर सरकारने योग्य उपाययोजना केल्या तर पुढील वर्षात सप्टेंबर २०२१ नंतर विकासदर सकारात्मक दिसू शकणार आहे.

चालू आर्थिक वर्षात विकासदर ९.५ टक्के घसरण्याचा आरबीआयचा अंदाज

विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात विकासदराबाबत अंदाज केलेल्या आकडेवारीहून सीतारामन यांनी अंदाजित केलेला विकासदर अधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे शक्तिकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षात विकासदर ९.५ टक्क्यांनी घसरणार असल्याचे म्हटले होते. कोरोना आणि टाळेबंदीने आर्थिक चलनवलन विस्कळित झाल्याने विकासदर घसरणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पुढील आर्थिक वर्षात जानेवारी-मार्चदरम्यान विकासदर वाढेल, असाही त्यांनी अंदाज व्यक्त केला होता.

निर्मला सीतारामन यांनी हे केले वक्तव्य

चालू आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) हा जवळपास शून्य राहिल, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. त्या भारत उर्जाचा मंच असलेल्या 'सेरावीक' कार्यक्रमात बोलत होत्या. टाळेबंदी खुली होताना अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचे संकेत दिसत आहेत. सणांच्या दरम्यान अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे. दुसऱ्या व चौथ्या तिमाहीत विकासदरात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details