पुणे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी जीएसटीमध्ये त्रृटी असल्याचे कबूल केले आहे. जीएसटीला शाप म्हणू नका, तर ती सुधारण्यासाठी मदत करावी, असे एका कर व्यावसायिकाच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्या कर व्यवसायिकांच्या बैठकीत बोलत होत्या.
शहरात कर व्यवसियाकांसोबत केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर व्यावसायिकाने जीएसटीला 'डॅम इट' असा शब्द वापरला. सीतारामन यांनी प्रश्न विचारत असलेल्या कर व्यवसायिकाला मध्येच थांबवून उत्तर दिले. संसदेत तसेच सर्व विधानसभेत मंजूर झालेल्या कायद्याला शाप (कर्स) म्हणू नका, असे त्यांनी म्हटले.
पुढे सीतारामन म्हणाल्या, मला माहित आहे, तुम्ही तुमच्या अनुभवावर बोलत आहात. मात्र ही देवाने केलेली रचना (जीएसटी) आहे, असे आपण म्हणू शकत नाही. जीएसटीच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सर्व भागीदारांनी काही उपाय सांगावेत, असेही त्यांनी आवाहन केले. शर्मा यांनी जीएसटीच्या सुधारणेसाठी काही उपाय सूचविले आहेत. याबाबत त्यांना दिल्लीमध्ये भेटण्यास सीतारामन यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात भारताची व्यापारी तूट कमी करण्यावर चर्चा