नवी दिल्ली- बँकांकडील थकित मालमत्तेचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठीचे पोर्टल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत लाँच केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक बँकांचे प्रमुख, इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बँकांमधील प्रश्नाबाबत चर्चा केली. यावेळी वित्तीय सचिव, महसूल सचिव, अर्थव्यवहार सचिव, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव, सीबीआय संचालक, आरबीआयचे प्रतिनिधी आणि एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन आर्थिक व्यवहारावर आकारले जाणारे मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) १ जानेवारी २०२० पासून बंद होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.