नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ई-सिगरेटवर बंदी घालण्याच्या निर्णयाची घोषणा केली. हा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा अधिकार आहे का, असा सवाल बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी ट्विट करून उपस्थित केला. यावर निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे.
ई-सिगरेटवरील बंदीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित राहिल्याबद्दल किरण मुझुमदार शॉ यांनी सवाल उपस्थित केला. सीतारामन या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी काम करत नाहीत. गुटखाबंदीबाबत काय? अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्रालय कशी उपाययोजना करणार आहे?
शॉ यांच्या टीकेला निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, ती पत्रकार परिषद ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत होती. मंत्रिगटाची प्रमुख या नात्याने उपस्थित राहिल्याचे त्यावेळी सुरुवातीलाच सांगितले होते. हर्ष वर्धन हे आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी विदेशात गेले आहेत.
हेही वाचा-सरकारी बँकांच्या प्रमुखांची निर्मला सीतारामन घेणार बैठक; बँक विलिनीकरणाची होणार चर्चा