महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तडा; ९० दिवसात १० हजार कोटींचे नुकसान

काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक म्हणाले अजूनही स्थिती पूर्वपदावर आली नाही. किती नुकसान झाले याचा अंदाज करणे कठीण आहे. विविध उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे अत्यंत अवघड आहे.

संग्रहित - श्रीनगर

By

Published : Oct 28, 2019, 7:53 PM IST

श्रीनगर - केंद्र सरकारने विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. गेल्या 90 दिवसात जम्मू आणि काश्मीरमधील व्यवसायाचे 10 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स्थानिक व्यापार संघटनेने म्हटले आहे.

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचे 370 कलम 5 ऑगस्टला रद्द केले. या निर्णयाला रविवारी 84 दिवस पूर्ण झाले आहेत. तेव्हापासून खोऱ्यातील बाजारपेठ बंद आहे, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. काही दुकाने सकाळी व संध्याकाळच्या वेळी सुरू राहतात. यामध्ये श्रीनगरमधील मध्यवर्ती ठिकाण असलेले लाल चौकातील दुकानांचाही समावेश आहे.
काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक म्हणाले, अजूनही सामान्यस्थिती पूर्वपदावर आली नाही. किती नुकसान झाले याचा अंदाज करणे कठीण आहे. विविध व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे अत्यंत अवघड आहे.

हेही वाचा-ग्राहकाची वाहन खरेदीची हौस भारी; चार पोत्यांमधील नाणी मोजताना कामगारांची दमछाक


काश्मीर भागामधील सुरू असलेल्या व्यवसायांचे 10 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांना फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात काही क्रियाकल्प (अॅक्टिव्हिटी) सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यांना मिळणारा प्रतिसाद निराशाजनक आहे.

हेही वाचा-आयबीजेच्या मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदीचा धुमधडाका; 100 किलो सोन्यासह 600 किलो चांदीची विक्री


इंटरनेट ठप्प असल्याने सर्वात मोठे नुकसान झाल्याची त्यांनी शक्यता व्यक्त केली. सध्याच्या काळात इंटरनेट ही कोणत्याही व्यसायासाठी मुलभूत गरज आहे. इंटरनेट बंद ठेवल्याने काश्मीरचे नुकसान होईल, असे आम्ही राज्यपाल प्रशासनाला आम्ही कळविले होते. तसेच अर्थव्यवस्था कमुकवत होईल, असे सांगितले होते. त्याचा दीर्घकाळासाठी मोठा वाईट परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ हस्तकला क्षेत्रामधील लोक हे जुलै-ऑगस्टमध्ये कामाच्या ऑर्डर घेतात. तर विणकर आणि कारागिर हे ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या तोंडावर मागणीप्रमाणे पुरवठा करतात. मात्र, इंटरनेट बंद असल्याने त्यांनी 50 हजार नोकऱ्या गमाविल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details