महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'इतना सन्नाटा क्यों है भाई', मंदीवरून शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा - Samana Editorial News

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबात सामनामधून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. देशात आर्थिक मंदी आहे. जीएसटी आणि नोटाबंदीने अर्थव्यवस्था बिघडल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहे.

संग्रहित - सामना अग्रलेख

By

Published : Oct 28, 2019, 5:55 PM IST

मुंबई- शिवसेना-भाजपमध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत शिवसेनेने मुखपत्र सामनामधून मंदीच्या विषयावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाच्या आर्थिक क्षेत्रात दिवाळी साजरी करावी, असे वातावरण कुठेच दिसत नाही. हा सर्व शुकशुकाट असताना 'इतना सन्नाटा क्यों है भाई', असा सवाल शिवसेने मुखपत्रामधून मोदी सरकारला विचारला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबात सामनामधून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. देशात आर्थिक मंदी आहे. जीएसटी आणि नोटाबंदीने अर्थव्यवस्था बिघडल्याचेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा-एफपीआयकडून ऑक्टोबरमध्ये भांडवली बाजारात ३ हजार ८०० कोटींची गुंतवणूक

दिवाळी सणाचा उत्साह मंदीमुळे हरवला आहे. दिवाळीसाठी बाजारपेठेत फटाक्यांबरोबरच खरेदीचा धुमधडाका दिसत नाही. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवाळीमधील दोन दिवस संपले आहेत. बाजारपेठेत ३० ते ४० टक्के खरेदी कमी झाल्याने रौनक हरवली आहे. निवडणुकातही धुमधडाका कमी आणि शुकशुकाटच अधिक झाला, या स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेनंतर झालेल्या परिणामावर बोट ठेवण्यात आले आहे. देशातील कारखानदारी धोक्यात आल्याचेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे. रोज नवनवीन कंपन्या आणि प्रतिष्ठाने दिवाळखोरी जाहीर करत आहेत. बँकांचे दिवाळे वाजताना दिसत आहे. जनतेचा खिसा आणि तिजोरीत खडखडाट होत आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details