मुंबई - कोरोनाच्या धसक्याने मुंबई शेअर बाजारात आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. शेअर बंद होताना निर्देशांक २,९१९.२६ अंशांनी घसरून ३२,७७८.१४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ८६८.२५ अंशांनी घसरून ९,५९० वर स्थिरावला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला 'महामारी' म्हणून घोषित केले आहे. कोरोनाच्या जगभरातील वाढत्या प्रसाराने दलाल स्ट्रीटवर औदासिन्य पसरले आहे. दुपारी शेअर बाजार निर्देशांकात ३०२३.२४ अंशांनी घसरण झाली होती. मुंबई शेअर बाजार ३२,६७४.१६ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ८८५.९० अंशांनी घसरून ९,५६८ वर पोहोचला होता.
शेअर बाजारातील १५७ कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. तर २,१३५ कंपन्यांचे शेअर घसरले आहे. तर ७२ कंपन्यांचे शेअर स्थिर राहिले आहेत. कोरोनाच्या धसक्याने मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात २,४०० अंशांनी घसरण झाली. तर निफ्टीत ७०० अंशांनी घसरण झाली . मुंबई शेअर बाजार २,४३७ अंशांनी घसरून ३३,२५९.६९ वर पोहोचला आहे. निफ्टीचा निर्देशांक ७३१.९० अंशांनी घसरून ९,७५६.५० वर पोहोचला.
शेअर बाजार दुपानंतर न सावरता उलट अधिक घसरण झाली आहे.