महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एसबीआयकडून चालू महिन्यात 6 हजार 169 कोटींच्या अनुत्पादक मालमत्तेचा लिलाव - financial assets

लिलावाची प्रक्रिया २२ मार्च ते ३० मार्चदरम्यान करण्यात येणार आहे. या मालमत्तेची विक्री मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (एआरसीएस), बँका, बिगर बँकिग वित्तीय संस्था आणि वित्तीय संस्थांना करण्यात येणार आहे

संग्रहित

By

Published : Mar 20, 2019, 3:17 PM IST

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अनुत्पादक मालमत्तेचा (एनपीएन) मोठा लिलाव करणार आहे. विविध थकबाकीदारांकडे असलेल्या या एकूण एनपीएची किंमत ६ हजार १६९ कोटी एवढी आहे.

लिलावाची प्रक्रिया २२ मार्च ते ३० मार्चदरम्यान करण्यात येणार आहे. या मालमत्तेची विक्री मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (एआरसीएस), बँका, बिगर बँकिग वित्तीय संस्था आणि वित्तीय संस्थांना करण्यात येणार आहे. या अनुत्पादक मालमत्तेची किंमत राखीव ठेवण्यात आली आहे. यामध्ये जैन इन्फ्रास्ट्रक्चर लि., कमाची इंडस्ट्रीयल लि., पेरेंटेरल ड्रग्ज या कंपन्यांचा समावेश आहे. २६ मार्चला एसबीआय ३ हजार ६४५ किंमतीची मालमत्ता विकण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. यामध्ये इंडिया स्टील कॉर्पोरेशनची ९२९ कोटींची मालमत्ता, जय बालाजी इंडस्ट्रीजची ८५९ कोटींची मालमत्ता आहे. या व्यतिरिक्त कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शनची २०७.७७ कोटींची मालमत्ता, मित्तल कॉर्पची ८५९.३३ कोटींची मालत्ता आहे.

एसबीआय बीएमएम इस्पात लि. कंपनीची १ हजार ७४८ कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. २९ मार्चला यशस्वी यार्नची ७७६ कोटींची मालमत्ता, सुमिता टेक्स स्पिन, शेखावती पॉलि-यार्न लि., शाकुभंरी स्ट्रॉ यांची ३०५ कोटींची मालमत्ता यांचा लिलाव होणार आहे. सरकारी मालकीच्या बँकांचा एनपीए वाढल्याने त्यावर मात करण्यासाठी एसबीआयसारख्या बँका प्रयत्न करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details