मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी आर्थिक वर्ष २२ मध्ये विकासदर हा ७.९ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी या अर्थतज्ज्ञांनी २०२२ मध्ये विकासदर हा १०.४ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याने विकासदरावर परिणाम होणार असल्याचे एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. वेगाने लसीकरण करावे, असेही एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! स्पूटनिक व्हीचे ३० लाख डोस हैदराबादमध्ये दाखल
आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तुंच्या किमतीनेही जीडीपीच्या विकासदरावर परिणाम
कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे आमच्या विश्लेषणातून दिसून आले. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शहरी भागाप्रमाणे बळकट नाही. मागणी वाढ झाली तरी आर्थिक वर्ष २०२२ मधील जीडीपीच्या अंदाजावर मोठा फरक पडणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तुंच्या किमतीनेही जीडीपीच्या विकासदरावर परिणाम होणार आहे. एकूण मागणीतील वाढ ही व्यापार, हॉटेल, वाहतूक, ब्रॉडकास्टिंगशी निगडीत संवाद आणि सेवा यांच्याशी निगडीत राहणार आहे. कारण, या क्षेत्रांमधून थेट २५ कोटी कुटुंबे अवलंबून आहेत.