नवी दिल्ली- देशामधील टाळेबंदीमधून बाहेर पडण्याकरता भारताला बुद्धिवान रणनीतीची गरज आहे. हे परत येवू न शकणाऱ्या विकासदराची घसरण थांबविण्यासाठी आवश्यक असल्याचे स्टेट बँकेच्या इकॉरॅप अहवालात म्हटले आहे.
मागील अनुभवावरून मंदीनंतर सुधारणा होवून अर्थव्यवस्थेची मागील उंची गाठण्यासाठी किमान पाच ते दहा वर्षे लागतात. केवळ कृषी क्षेत्रात चंदेरी किनार म्हणजे कृषी क्षेत्र आहे. कृषी आणि जोडधंद्याचा मागील आर्थिक वर्षात विकासदर हा ४ टक्के राहिला आहे. तर आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये कृषी आणि जोडधंद्याचा विकासदर हा २.४ टक्के विकासदर असल्याचे स्टेट बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-टाळेबंदीतही उद्योगाची चिकाटी.. ह्युदांईकडून ५ हजार चारचाकीची निर्यात
असे असले, तरी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मागील तिमाहींच्या विकासदरांची सुधारीत आकडेवारी दिली आहे. हे थोडेसे गोंधळात टाकणारे आणि आकडेवारीच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणारे आहे. नव्या आकडेवारीच्या शृखंलेत लक्षणीय अस्थिरता आहे. जर सांख्यिकी कार्यालयाने आकेडवारी गोळा करण्याच्या पद्धतीबाबत सूचना टाकली तर त्याचा खूप उपयोग होईल, असे अहवालात म्हटले आहे.