कोलकाता - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट ऑफ इंडियाने चालू वर्षात १२ ते १४ टक्के कर्ज वृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. गेल्या वर्षी कर्ज वृद्धी दर हा १४ टक्के होता, अशी माहिती एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिली. ते बँकांच्या शाखा व्यवस्थापकांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
कर्ज वृद्धीत चालू वर्षात १२ ते १४ टक्के वाढ होईल - एसबीआय चेअरमन
कॉर्पोरेट क्षेत्राकडून कर्जाची अधिक मागणी व्हावी, अशी अपेक्षा एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी व्यक्त केली.
देशात कर्जदारांची एकूण २३ लाख कोटींचे कर्ज घेण्याची क्षमता (लोन पोर्टफोलिओ ) आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून कर्जाची अधिक मागणी व्हावी, अशी अपेक्षा एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, कृषी क्षेत्रातील एनपीएचे प्रमाण ही समस्या आहे. कर्जमाफी योजनेमुळे कृषी पतपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांतरीत केल्याने फायदा होवू शकतो. बँका, राज्य व केंद्र सरकारने कृषीला पतपुरवठा वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
ज्या ग्राहकांचे गृहकर्ज हे रेपो दराशी संलग्न आहे त्यांना व्याजदर हा ८.५ टक्क्याऐवजी ७.६५ टक्के करण्यात आला आहे. एसबीआयने एमसीएलआर हा ८.५५ टक्क्यावरून ८.२५ टक्के करण्यात आला आहे.