मुंबई - सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाला युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्सने (युएफबीयू) विरोध केला आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांचे खासगीकरण केल्यानंतर लोकांनी मेहनतीने कमविलेल्या ८० लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे बँकिंग संघटनेने म्हटले आहे.
युएफबीयूचे समन्वयक देवीदास तुळजापुरकर म्हणाले की, खासगी बँका हे नफ्यासाठी काम करतात. तर सार्वजनिक बँका सामाजिक नफ्यासाठी काम करतात. त्यामुळे सार्वजनिक बँकांचे खासगीकरण हे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठणार नाही. सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत युएफबीयू १५ मार्च ते १६ मार्चदरम्यान दोन दिवसीय संपावर जाणार आहे. देशाला अजूनही गरिबी, बेरोजगारी, भूक यांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशात आर्थिक विषमता आणि भौगोलिक विषमता असल्याने सामाजिक क्षेत्रासाठी योजना राबविण्याची गरज आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्र हे सामाजिक क्षेत्रासाठी कमी योगदान देतात.
हेही वाचा-ऑनलाईन जोखीम व्यवस्थापन व्यवस्थेमधील त्रुटीने एनएसएईमधील यंत्रणा ठप्प