महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पर्यटनाच्या प्रोत्साहनाकरिता २,५०० कोटींची तरतूद - अर्थसंकल्प २०२० अपडेटस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Nirmala Sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By

Published : Feb 1, 2020, 3:36 PM IST

Updated : Feb 1, 2020, 4:26 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरता २,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना पर्यटन आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

हेही वाचा-बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेला मोठे यश - अर्थमंत्री निर्मला सितारामन

  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयासाठी ३,१५० कोटी रुपयांची तरतूद
  • आदिवासी मंत्रालयाचे रांची व झारखंडमध्ये आदिवासी वस्तूसंग्रहालय
  • पर्यटन वर्ष २०२०-२१ साठी पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरता २,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट अँड कल्चरची स्थापना करण्याची त्यांनी घोषणा केली.
  • राखिगृही, हस्तिनापूर, शिवसागर, ढोलविरा, आदिछनल्लूर या ५ ठिकाणी आदर्श पुरातत्व स्थळ विकसित करण्यात येणार आहे.

हेही वाचा-अर्थसंकल्प २०२० : प्राप्तीकरामध्ये सामान्यांना दिलासा; सोमवारपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित..

Last Updated : Feb 1, 2020, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details