महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आरबीआय १५ हजार कोटींचे सरकारी रोखे विकत घेणार

चलनाच्या तरलतेचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने सरकारी रोखे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआय

By

Published : May 24, 2019, 7:43 PM IST

मुंबई - एनडीए बहुतमतात सरकार स्थापन करणार असल्याने शेअर बाजारात तेजी आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णय आरबीआयने घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक पुढील महिन्यात १५ हजार कोटींचे सरकारी रोखे विकत घेणार आहे.

आरबीआय हे सरकारी रोखे ओपन मार्केट ऑपरेशनमधून खरेदी करणार आहे. चलनाच्या तरलतेचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयने सरकारी रोखे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारातील चलनाची तरलता वाढेल, अशी आरबीआयला अपेक्षा आहे. सरकारी रोख्यांची खरेदी १३ जून रोजी करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details